*सिंधुदुर्ग जिल्ह्यात बालकांमधील न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'SAANS Campaign' ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.* या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा टास्कफोर्स ची मीटिंग मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाली.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील ,जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.रमेश करतसकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री निलेश मटकर ,सांख्यिकी अधिकारी श्री निकेत जाधव डीपीएचएन श्री. विक्रम पवार व अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.