यवतमाळ: जिल्हा बँक वादग्रस्त पदभरती रद्द ; उच्च न्यायालयाने दिली स्थगिती
यवतमाळ येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक आणि शिपाई अशा एकूण १३३ पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ही पदभरती सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.दरम्यान ही बाब नियमबाह्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने एमआयएसटी कंपनीचे अपील फेटाळून लावले.