देवळी: पुलगावमध्ये क्रूरता:चरित्र्याच्या संशयावरून वाद!पतीने ब्लेडने हल्ला करून पत्नीला केले गंभीर जखमी; गुन्हा दाखल
Deoli, Wardha | Oct 14, 2025 पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एका किरकोळ वादातून एका पतीने आपल्या पत्नीवर ब्लेडने हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुलगाव पोलीस स्टेशनमध्ये दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे आज 14 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे फिर्यादी सौ. निकिता शिवदास चवरे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार,13ऑक्टो रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास घुबडटोली, येथे ही घटनाघडली आहे.