अतिदुर्गम सालेकसा तालुक्याची आरोग्य विषयक आढावा सभा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. आढावा सभेप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विषयक कामाचा आढावा घेण्यात आला. त्यांनी, आरोग्य संस्थेतील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना अतिदुर्गम सालेकसा येथील गावपातळीवरील लोकांपर्यंत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व योजना यांची प्रभाविपणे अंमलबजावणी करुन या बैठकीमध्ये विविध राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी, प्रगती आणि अडचणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.