शिरपूर: तालुक्यातील रुपसिंगपाडा येथे उसाच्या शेतावर तालुका पोलिसांचा छापा,लाखो रुपये किमतीचा 230 किलो गांजा जप्त
Shirpur, Dhule | Sep 18, 2025 तालुक्यातील रुपसिंगपाडा येथे एका घरावर छापा टाकून मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा प्रतिबंधीत गांजा अमली पदार्थच्या साठ्यावर 17 सप्टेंबर रोजी रात्री छापा टाकून 16 लाख 5 हजार 940 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळल्यावरून रुपसिंग दुर्गा पावरा रा. रुपसिंगपाडा पो. आंबे ता. शिरपूर जि. धुळे याच्या राहते घराच्या पाठीमागील शेतावर करण्यात आली.