मेहकर: विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; दादुलगव्हाण येथील घटना
शेतकरी जीवनातील संकटाला आणखी एक दुर्दैवी घटना जोडली गेली आहे. मेहकर तालुक्यातील दादुलगव्हाण येथे ६० वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पभूधारक शेतकरी रामभाऊ कोंडू पनाड हे रोजच्या प्रमाणे सकाळी शेतात काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे शॉक लागून मृत्यू झाला.