नागपूर ग्रामीण: अकस्मात मृत्यू नसून तो अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू अमरावती रोडवर झाला होता अपघात
23 सप्टेंबरला सकाळी सहा वाजताच्या सुमारास पोलीस ठाणेवाडी हद्दीतील अमरावती रोडवर दुचाकीने जाणारे रोशन ढोणे हे बेशुद्ध अवस्थेत आढळले होते उपचारादरम्यान मेयो रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद वाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता अज्ञात वाहनाच्या चालकाने त्यांना धडक देऊन तो वाहन चालक घटनास्थळावरून पडून गेला असे लक्षात आले.