चंद्रपूर: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात भाजप सरकारने धूळ फेकली, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात भाजप सरकारने धूळ फेकली असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी ब्रम्हपुरीत केली आहे.कांदा निर्यात बंदी उठली म्हणत नुसती दवंडी पिटली गेली,गॅरंटी - गॅरंटी अशी जाहिरात करणाऱ्या सरकारकडे आशेने बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात झाली ती केवळ धूळफेक. शेतकऱ्यांचे अश्रू पुसून त्यांना धीर देणारे हे काँग्रेसचे सरकार नाही. हे तर धूळफेक करून फसवी गॅरंटी देणारे मोदी सरकार आहे,अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.