जालना: वाळुची अवैध वाहतुक करणार्या तस्करांना तडीपार करा - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश
Jalna, Jalna | Oct 29, 2025 महसूल व पोलिस प्रशासनाने अवैध वाळु चोरी विरोधात संयुक्त कारवाई करावी. प्रत्येक तालुक्यातील अवैध वाळु वाहतुक असलेली ठिकाणे तहसीलदार व पोलिस विभागाने निश्चित करावे. अशा ठिकाणी सीसीटिव्ही लावण्याची कारवाई करण्यात यावी. तरी जिल्ह्यातील वाळुची अवैध वाहतुक करणार्या तस्करांना तडीपार करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बुधवार दि. 29 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध वाळु उपसा रोखण्यासाठी विशेष बैठक पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या.