बातमी निफाड नगरपंचायत, निफाड निफाडला नायलॉन मांजा व प्लास्टिक पिशवी जप्त करण्यासाठी धडक मोहीम सुरू. 10 किलो प्लास्टिक जप्त. निफाड नगरपंचायत मार्फत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरामुळे पक्षी, प्राणी तसेच नागरिक यांना इजा होऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पतंगांसाठी नायलॉन मांजा वापरावर बंदी करण्यात आली आहे, त्यास अनुसरून नगरपंचायत मार्फत नायलॉन मांजाच्या खरेदी व विक्री वर बंदी घालण्यात आली आहे.