हिंगणघाट: सेवा पंधरवड्यात निमित्ताने शासनाच्या विविध योजनांचा जनसामान्यांपर्यंत लाभ पोहचवा:आमदार समिरभाऊ कुणावार
हिंगणघाट शहरातील निखाडे सभागृहात सेवा पंधरवडा निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या तालुका व शहरातील मंडळ कार्यकारिणीची कार्यशाळा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेचे उदघाटन आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना आमदार समिरभाऊ कुणावार म्हणाले की १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राष्टनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस ते राष्टपिता महात्मा गांधीं याच्या जयंती निमित्ताने सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे.