कोरेगाव: चिमणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत रेठरे खुर्द येथील तरुणाचा मृत्यू
चिमणगाव येथे ५ नोव्हेंबर रोजी पहाटे घडलेल्या भीषण अपघातानंतर रविवारी ३० नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात रेठरे खुर्द, ता. कराड येथील प्रविण भिमराव मंडले, वय ३७ यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस ठाण्यातून सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास चिमणगाव गोटा ते जरंडेश्वर कारखाना रस्त्यावर शंकर जाधव यांच्या पडीक जमिनी शेजारी प्रविण मंडले यांना धडक दिली.