ऐतिहासिक दस्तऐवजांचे मुलुंड येथे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांच्याहस्ते उद्घाटन
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या महत्त्वाचे दस्तऐवज प्रदर्शनामध्ये सर्वसामान्यांसाठी शासनाने खुले केले असून ते जास्तीत जास्त नागरिकांनी नक्की पहा, असे आवाहन आज मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचनालयातर्फे सेवा सप्ताह निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या संबंधित पुराभिलेख संचलनातील अत्यंत दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.