पवनी: पवनी नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : डॉ विजया नंदुरकर यांची भरपाईची मागणी
Pauni, Bhandara | Oct 16, 2025 दिवाळीच्या तोंडावर आपल्या कष्टाच्या कमाईचे धान्य हातात येईल या आशेने शेतकरी राब राब राबून शेती करतात, त्यासाठी कर्ज काढतात, परंतु पवनी नगर परिषदेच्या नियोजनबाह्य आणि निष्काळजी कामामुळे अनेक एकर शेतीत पाण्याचा विळखा बसला आहे. त्यामुळे उभे असलेले धान पाण्यात बुडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शिवारात नगर परिषदेकडून झालेल्या निकृष्ट कामामुळे बांध फाटले असून पाण्याचा विसर्ग थेट शेतीमध्ये घुसला.