भंडारा: भंडारा विधानसभा क्षेञातील विविध विकास कामांचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते लोकार्पण
भंडारा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधा व सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत विविध विकासकामांचे लोकार्पण आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. हे लोकार्पण १५ सप्टेबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास भंडारा - पवनी विधानसभा क्षेञातील ठिकठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. भंडारा विधानसभा क्षेत्राच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करणार असल्याचे आश्वासन आमदार भोंडेकर यांनी यावेळी दिले.