रामटेक शहरालगतच्या ग्रा. पं.शितलवाडी अंतर्गत परसोडा येथील कार्तिक मनोहर बावनकुळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात येणारी अत्यंत प्रतिष्ठेची व कठीण मानली जाणारी ESE (इंजीनियरिंग सर्विसेस एक्झामिनेशन) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. त्यामुळे रामटेक तालुक्यातून ही परीक्षा पास होऊन या सेवेत निवड होणारे ते पहिले अधिकारी ठरले आहेत. बुधवार दिनांक 17 डिसेंबरला सायंकाळी गावात ही बातमी येताच त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.