ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम तुमखेडा खुर्द येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमांकडून ग्रामीण पोलिसांनी मोहफुलाची पाच लिटर दारू जप्त केली. सदर कारवाई १५ डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.