माळशिरस: शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केल्यास हायड्रोजन बरोबरच अणुबॉम्ब देखील येणार आहे : आमदार उत्तमराव जानकर
शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केल्यास हायड्रोजन बरोबरच अणुबॉम्ब देखील येणार आहे, असा इशारा माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी दिला आहे. आज बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता पत्रकारांशी बोलताना दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांच्यावर यावेळी जानकर यांनी टीका केली आहे.