अंबाजोगाई: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने
Ambejogai, Beed | Oct 22, 2025 अंबाजोगाईत किसान सभेच्या वतीने आज बुधवार, दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी सोयाबीन आणि कापसाच्या शासकीय खरेदी केंद्रांना तातडीने सुरुवात करावी, सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरीव मदत देण्याची मागणी करण्यात आली.तसेच उद्योगपती धार्जीने होणारे सक्तीचे जमीन अधिग्रहण थांबवावे, अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली.यापुढे हे आंदोलन गावोगावी र