पुसद: आसोला फाटा येथे दुचाकी अपघातात एकजण जखमी, खंडाळा पोलिसात गुन्हा दाखल
Pusad, Yavatmal | Oct 15, 2025 फिर्यादी अशोक रामराव राठोड यांच्या तक्रारीनुसार 13 ऑक्टोबरला अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी आपल्या दुचाकीने जात असताना आरोपी मिथुन राजू चव्हाण याने त्याच्या ताब्यातील दुचाकी वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या दुचाकीस ठोस मारून अपघात केल्याने फिर्यादी जखमी झाले. या प्रकरनी 14 ऑक्टोबरला रात्री अंदाजे दहा वाजताच्या सुमारास खंडाळा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.