तळा: तळा:चैत्र पौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळा पोलीस ठाणे येथे बारा वाड्यातील ग्रामस्थांची मिटिंग संपन्न.
Tala, Raigad | Apr 19, 2024 २३ एप्रिल रोजी पार पडत असलेल्या चैत्र पौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळा पोलीस ठाणे येथे तळा पोलिसांतर्फे शुक्रवार दि.१९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान बारा वाड्यातील ग्रामस्थांची मिटिंग पार पडली. या मीटिंगमध्ये आगामी चैत्र पौर्णिमा उत्सव शांत पद्धतीने साजरा करावा असे आवाहन तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले. याप्रसंगी चंडिका देवी ट्रस्ट चे अध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,नगरसेवक मंगेश शिगवण उपस्थित होते.