बोदवड: बोदवड तालुक्यातील वडजी येथून मलकापूर गेलेली २१ वर्षीय तरुणी बेपत्ता, बोदवड पोलीस हरवल्याची तक्रार
Bodvad, Jalgaon | Nov 14, 2025 बोदवड तालुक्यात वडजी हे गाव आहे. या गावातील रहिवाशी नेहा गणेश खाचणे वय २१ ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली की मी बी.ई. इंजिनिअरिंग कॉलेज मलकापूर येथे जात आहे. असे सांगून घरून गेलेली तरुणी नंतर परत आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून बोदवड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रा नोंदवण्यात आली आहे.