खुलताबाद: गल्लेबोरगावमधील नवीन वीज जोडणीसंदर्भात पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
गल्लेबोरगाव येथील ३३ केव्ही नवीन पावर जोडणी गावातील वस्तीमधून होण्यामुळे मनुष्यहानी व मोठ्या अपत्तीचा धोका उद्भवू शकतो, अशी चिंता व्यक्त केली गेली आहे.पँथर्स रिपब्लिकन पार्टी तालुका अध्यक्ष राजअनंत सुरतकर यांनी नागरिकांच्या वतीने तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन दिले निवेदनात नमूद आहे कि सध्याचा वीजपुरवठा कागजीपुरा मार्गे खंडित होत असल्याने देवळाणा ता. कन्नड येथून जोडणी केली जात आहे; त्यास विरोध नाही.पण नवीन पावर जोडणी गावाबाहेरून केली जावी अशी मागणी करण्यात आलीय