शहादा: नंदुरबार जिल्ह्यात ८५ + वय व दिव्यांगांसाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा, जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची माहिती
८५ + वय व दिव्यांगांसाठी टपाली मतपत्रिका ८५ वर्षापेक्षा अधिक वय असणारे जेष्ठ नागरिक व ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणारे दिव्यांग मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याकरीता अशा संवर्गातील मतदारांना फॉर्म १२ डी घरोघरी पोहचविण्यात येणार आहे. लोकसभा मतदार संघात ८५ मतदार संख्या १९ हजार ३१० असून या मतदारांशी संपर्क करुन ११५४ मतदारांनी गृह मतदानासाठी संमती दिली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिली.