रिसोड मार्गावरील घोटा फाट्यावर शनिवारी रात्री सुमारास भीषण अपघात झाला. चारचाकी क्रूझर आणि दुचाकी पल्सर यांच्यात झालेल्या धडकेत एकाचा जागेवर मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दुचाकीवरून रिसोडकडे येत असलेले अंकुश महादेव अंभोरे (वय 23) आणि प्रदीप अंभोरे (वय 23) हे दोघेही पार्डी तिखे येथील रहिवासी आहेत. या अपघातात अंकुश अंभोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला असून प्रदीप अंभोरे गंभीर जखमी झाला आहे.