रामटेक: रामटेक तालुक्यातील महादुला येथून जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत पाणंद रस्ते विषयक मोहीम सुरू
Ramtek, Nagpur | Sep 20, 2025 शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता नरेंद्र मोदी जन्मदिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती अर्थात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शनिवार दिनांक 20 सप्टेंबरला दु.एक वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत महादूला येथे प्रत्यक्ष भेट दिली. सेवा पंधरवाडा अंतर्गत पहिला टप्पा पाणंद रस्ते विषयक मोहीम अंतर्गत त्यांनी महादूला येथील पाणंद रस्त्याची पाहणी केली.