बाभूळगाव: सरुळ ते परसोड रोडच्या बाजूला असलेल्या नाल्यावर अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध बाभूळगाव पोलीसात गुन्हा..
फिर्यादी अविनाश सुरेश सरडे यांच्या तक्रारीनुसार 22 सप्टेंबरला आरोपी सुनील पवार व आणखी एक असे दोघेजण त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अवैधरित्या विनापरवाना रेती चोरून नेत असताना मिळून आले असता आरोपींच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली व रेती असा एकूण सात लाख पाच हजार 161 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून 22 सप्टेंबरला बाभूळगाव पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.