यवतमाळ: जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण बदलण्याची ट्रायबल फोरमची मागणी
राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण आरक्षित घोषित केले आहे.परंतु यामध्ये बदल करण्याची मागणी ट्रायबल फोरमने केली आहे.जिल्हा परिषदचे अध्यक्ष पद अनेक वर्षापासून आदिवासी समाजाला मिळालेच नाही. त्यामुळे रोटेशन धोरणात फेरबदल करून प्रतिनिधित्व देण्यात यावे अशी मागणी ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव मुंबई यांच्याकडे ट्रायबल फोरमचे जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी केली आहे.