जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे घुंगर्डे हदगाव येथे मत्स्योदरी विद्यालय मध्ये आज दिनांक 19 जानेवारी 20 26 रोजी मान्यवराच्या उपस्थितीमध्ये भव्य अपूर्व विज्ञान व गणित मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमात 200 विद्यार्थ्यांनी आपले विज्ञान प्रयोग सादर करून उपस्थितांची मनी जिंकली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी राहुल भालेकर हे होते तर उद्घाटक म्हणून अमर तहसीलदार विजय चव्हाण हे होते.