बायको सोडून गेली म्हणून आपल्या मोबाईलवर आत्महत्या करत असल्याचा स्टेटस ठेवून राहुरी रेल्वे स्टेशनवरील रेल्वे रूळावर झोपलेल्या एका इसमास राहुरी पोलिसांनी ताब्यात घेत त्यास आत्महत्या करण्यापासून रोखले आहे. महिंद्र देविदास कोळसे राहणार भेर्डापूर तालुका श्रीरामपूर असे त्या इसमाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंग यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सचिन ताजने अन् प्रमोद ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर इसमास रेल्वे रुळावरून बाजूला घेत वाचविले आहे.