शिरपूर: महामार्गावरील शहादा फाट्यावर मध्यरात्री मद्यपींचा गोंधळ,पोलिसांना शिवीगाळ,दगडफेक व मारहाण,5 जणांना अटक
Shirpur, Dhule | Nov 29, 2025 मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शहादा फाटा येथे उड्डाणपुलाखाली मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत निर्माण झालेल्या गोंधळ घालून पोलिसांवर शिवीगाळ, दगडफेक तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी 29 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलिसांनी पाच तरुणांना ताब्यात घेत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.रोशन रमेश पाटील,रा.कुडावद,तुषार घनश्याम बोराणे, हर्षल घनश्याम बोराणे,दोन्ही रा.कनसई, भूषण अशोक लहानगे,कल्पेश रमेश पाटील दोन्ही रा. म्हसावद,ता.शहादा यांना अटक केली आहे.