सिंदखेड राजा: शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य झाल्याने जलसमाधी आंदोलन स्थगित - माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर
सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांनी विविध मागण्यासाठी 45 फूट उंच पाण्याच्या टाकीवर बसून सुरू केलेल्या जलसमाधी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे.तहसीलदार यांनी मागण्या मान्य केल्याने आंदोलन स्थगित केल्याची माहिती माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता दिली आहे.