वाई: वाई विधानसभा मतदारसंघात भाजपचा मिशन विस्तार; मंत्री जयकुमार गोरे यांचा प्रभावी दौरा
Wai, Satara | Oct 31, 2025 मिशन भाजप अंतर्गत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडेच सोलापूरमध्ये मोठ्या जम्बो प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे मंत्री गोरे यांनी गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वाई येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बैठकीस माजी आमदार मदन भोसले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, रोहिदास पिसाळ, मंडल अध्यक्ष दीपक ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते.