सिकलसेल, थैलेसेमिया व होमोफिलिया या आनुवंशिक रक्तविकारांविषयी जनजागृती करण्यासाठी गोंदिया जिल्हा आरोग्य विभागामार्फत १५ ते २१ डिसेंबरदरम्यान जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयात तपासणी व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.