सुधागड: महागाव पाली एसटी बसचा ब्रेक फेल
चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अनेक प्रवाशांचे वाचले प्राण
सुधागड तालुक्यातील महागाव गावावरून शुक्रवारी (ता. 12) सकाळी 8.30 वाजता पालीकडे निघालेल्या एसटी बसचा (क्र. MH20 BL 3847) कवेळे आदिवासीवाडी जवळ वळण व उतारावर अचानक ब्रेक फेल झाला. यावेळी चालकाने प्रसंगावता दाखवत गाडी रस्त्याच्या बाजूला नेऊन थांबवली. त्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले. मात्र नादुरुस्त एसटी पुरवणाऱ्या परिवहन महामंडळावर प्रवाशांनी आक्रोश व्यक्त केला.