नांदुरा: शहरातच होणार आता म्हशींची खरेदी विक्री;शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार
नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना म्हशींची खरेदी विक्री करण्यासाठी खामगाव किंवा जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे जावे लागत होते. परंतु आता नांदुरा शहरात देखील म्हशीची खरेदी विक्री होणार आहे. प्रत्येक सोमवारी खामगाव रोडवरील स्विमिंगला लागूनच असलेल्या जागेत ही व्यवस्था करण्यात आली आहे.निश्चितच नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून आर्थिक बचत देखील होणार आहे.याबाबतची माहिती आज २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता घेण्यात आली आहे.