पन्हाळा: हातकणंगले: काखे येथील बिरुदेव मंदिर परिसरातील अतिक्रमणांच्या विरोधातील उपोषणाला मल्हारसेनेचा जाहीर पाठिंबा
काखे ता.पन्हाळा येथील धनगर समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या बिरुदेव मंदिर परिसरातील अतिक्रमणांच्या विरोधात सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला आज मल्हारसेनेचे जिल्हाप्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष शहाजी सिद यांनी सोमवार दि 19 मे रोजी दुपारी 3 वाजता उपोषणस्थळी भेट देत जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.“बिरुदेव हे धनगर समाजाचे श्रद्धास्थान आहे.मंदिर परिसरात झालेले अतिक्रमण हटवण्याची मागणी केली.