लाखनी: महाराष्ट्राचे विद्वान मुख्यमंत्री आहेत ते कोणालाही क्लीनचिट देतात : आमदार नाना पटोले
खरंच यांना दूध का दूध पाणी का पाणी करायचे असेल तर यांनी विकास खर्गे समितीच्या ऐवजी तुकाराम मुंडे ची चौकशी समिती करावी जे काही मुद्दे महाराष्ट्रामध्ये सॅम्पल मध्ये सांगितले आहेत. आमच्याकडे आणखी खूप काही मुद्दे आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढेच्या समितीच्या माध्यमातून चौकशी होऊ द्या. क्लीनचिट देणारे फडणवीस सरकार आहे. यांचा खरा चेहरा महाराष्ट्र समोर येईल देशाच्या समोर येईल. असे मत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.