जालना: जालना महानगरपालिकेचा जिल्हाधिकारी यांनी घेतला विभागनिहाय आढावा; विविध विभागांना दिल्या स्पष्ट सूचना
Jalna, Jalna | Oct 27, 2025 जिल्हाधिकारी तथा जालना शहर महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त आशिमा मित्तल यांनी सोमवार दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या कार्यालयाला भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि प्रशासकीय बाबींबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. यानंतर सकाळी 11:15 वाजता अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापालिकेच्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी सूचना दिल्या.