मौदा: निहारवानी येथे उपकेंद्र इमारत बांधकामाचे भुमीपूजन
Mauda, Nagpur | Oct 12, 2025 ग्रामीण भागात असलेल्या मौजा निहारवानी येथे उपकेंद्र इमारत बांधकामाचे भूमिपूजन सरपंच रवी चरडे यांच्या हस्ते करण्यात आले. याबाबत चे वृत्त असे की प्रशासनाच्या वतीने 15 व वीत्त आयोग अंतर्गत निहारवानी येथे उपकेंद्र इमारत बांधकाम साठी 42 लाख 59 हजार रुपये मंजूर करण्यात आले. सदर उपकेंद्र इमारत बांधकामचे भूमिपूजन सरपंच रवी चरडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच स्वप्नील चरडे, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभागाचे कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.