आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या सुहानी पडाल या विद्यार्थिनीच्या आयुष्यात आमदार राजू पारवे यांनी आधाराचा किरण निर्माण केला आहे. बेला येथील रहिवासी असलेल्या सुहानीचे वडील लहानपणीच वारले, तर तीन वर्षांपूर्वी आईचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सध्या ७० वर्षीय आजीसोबत राहणाऱ्या सुहानीची परिस्थिती जाणून आमदार पारवे भावूक झाले.27 जानेवारी ला बेला येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता, आमदारांनी सुहानीच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. सुहानी सध्या बारावीत शिकत असून तिला पुढे नर्सिंग करण्याची इच्छा आहे.