सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने घाटांशी संबंधित सर्व आराखडे शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयातून अंतिम करावेत, असे निर्देश कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी घाट नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कुंभमेळा काळातील भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता घाटांची वहन क्षमता, प्रवेश–निर्गमन मार्ग, आपत्कालीन स्थलांतर व्यवस्था, बॅरिकेडिंग तसेच तात्पुरत्या सुविधा यांचे एकसमान व प्रमाणित नियोजन आवश्यक असल्याचे आयुक्त सिंह