बुलढाणा: खळेगाव येथे आरोग्य विभागाच्या वतीने गोवर,रुबेला लसीकरण शिबिर
बुलढाणा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शिवणी पिसा अंतर्गत खळेगाव येथील ज्ञानगंगा प्राथमिक आश्रम शाळा येथे 15 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता आरोग्य विभागाने 5 वर्ष ते 15 वर्ष गोवर रुबेला लसीकरण मोहीम शिबिरा अंतर्गत विद्यार्थ्यांचे पोषण आहार,निवास स्थानके , पिण्याच्या पाण्याच्या टाक्या /कंटेनर, शाळेचा परिसर व आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले.