उमरी: बोळसा बु. येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या, उमरी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
Umri, Nanded | Nov 12, 2025 तालुक्यातील बोळसा बु. येथील तरुण शेतकरी सोपान मारोती डिडेवार वय 26 वर्ष याने शेत नापिकी मूळे त्रस्त होता त्यातच कर्ज कसे फेडावे ह्या विवंचनेत त्याने शेतात दि. 11 नोव्हेंबर रोजी सकाळी चिंचेच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती, या प्रकरणी उमरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोउपनि सूर्यवंशी हे करत आहेत, मयत शेतकरी सोपानवर बँकेचे कर्ज व सावकारी कर्ज देखील असल्याचे समजते आहे.