निफाड तालुक्यात बिबट्याची दहशत; पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी - निफाड तालुक्यातील शिवडी, उगांव परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून त्याचा वाढता वावर स्थानिकांसाठी धोकादायक ठरत आहे. या कालावधीत बिबट्याने दोन कुत्रे व दोन मेंढ्यांचा फडशा पाडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उगांव रेल्वे स्टेशन व शिवडी परिसरात बिबट्या तळ ठोकून असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी त्याचे दर्शन होत असून,