धुळे: धुळेकरांवर दुहेरी संकट! पांझरा नदी पुराच्या पाण्यातून विषारी सर्प येत असल्याने नागरिकांमध्ये भीती, सतर्कतेचे आवाहन
Dhule, Dhule | Sep 30, 2025 धुळे शहरात अक्कलपाडा धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पांझरा नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या पुरासोबत साप आणि इतर सरपटणारे प्राणीही वाहून येत आहेत. त्यामुळे ते रहिवासी भागांत शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना पुराबरोबरच सापांच्या धोक्यापासूनही सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.