प्राथमिक आरोग्य केंद्र शिवनी येथे जिल्हा क्षयरोग कार्यक्रमाची जिल्हास्तरीय टीमची आकस्मिक भेट.
8.6k views | Yavatmal, Maharashtra | Jul 24, 2025 यवतमाळ : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांचे मार्गदर्शनाखाली टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हाअक्षरोप अधिकारी कार्यालय यवतमाळ येथील जिल्हास्तरीय टीमने प्राथमिक आरोग्य केंद्र शिवनी येथे आकस्मिक भेट देऊन अभियानाचे प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सूक्ष्म नियोजन विषयी पाहणी केली. तसेच वार्षिक क्षय रुग्ण संख्या याची पडताळणी करून उपचार घेत असलेल्या रुग्णांची सविस्तर माहिती घेतली. तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले.