भामरागड: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत टेकला ग्रामपंचायतीत स्वच्छता, आरोग्य व विकासाचे उपक्रम उत्साहात
तालुक्यातील ग्रामपंचायत टेकला अंतर्गत मौजा कुमरगुडा व टेकला येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 अंतर्गत दिनांक 01 ऑक्टोबर 2025 पासून विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. गावच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून ग्राम स्वच्छता, आरोग्य शिबीर, पाईपलाईन गळती दुरुस्ती, शिवार फेरी, कंपोस्ट खत खड्डा भरणे, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती, तसेच शाळा व अंगणवाडी स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहे अशी माहिती ग्रामपंचायत चा वतीने गूरूवार रोजी देण्यात आली.