वर्धा: जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
Wardha, Wardha | Jul 13, 2025 वर्धा : जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई केली. पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील 19 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 12 जुलै रोजी 7 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण 13 लाख 81 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 33 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही माहिती आज पोलिसांनी दिली आहे.