सेलू: शहरातील भाजी बाजारात डोळ्यावर मारून एकास जखमी केले, पोलिसांत गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Oct 16, 2025 मित्रासोबत बोलत असलेल्या एकास दोघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना ता. 15 ला रात्री 8 वाजता मेडिकल चौकातील भाजी बाजारात घडली. गौरव मोहन पोतीरवार वय 24 रा. सेलू असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी तक्रारीवरून आरोपी सुरज मारोतराव ढाले व मारोतराव ढाले दोघेही रा. सेलू यांच्या विरुद्ध दि. 16 गुरुवारी दुपारी 3.30 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून मिळाली.